राज्यघटना शिल्पकार
[राज्य पुरस्कार प्राप्त काव्य.]
दीन दलितांचा करण्या उद्धार,
‘प्रबुद्ध भारत’ करण्या साकार।
भिम जन्मला ग सखी, भिम जन्मला।।धृ।।
उच्चभ्रूंचा स्वैराचार,
नारीवरचा अत्याचार।
स्पृश्यास्पृश्य भेदाभेद,
दुःख संहारण्या सत्वर।
दयाघन हा गर्जला ….. ।।१।।
हवे सर्वांना शिक्षण,
कुणी न राहो निरक्षर।
गुरू जोतिबांचा प्रण,
पूर्णसत्य ठरण्या निरंतर।
ज्ञानसागर उफानला ….. ।।२।।
सत्य न्याय निती समान संधी,
प्रेमरसाचा हवा सुकाळ।
समता स्वातंत्र्य बंधुत्वाचा
व्हाया राज्यघटना शिल्पकार।
बहुजन कैवाराला ….. ।।३।।
भेदभावाच्या भिंती तोडाया,
कणव एकतेचे पूल बांधाया।
काळाराम मंदिरी प्रवेशाया,
जीवन तळे चवदार करावया।
महामानव तो धावला ….. ।।४।।
शुद्रादिकाचेही गुणी संतान,
घेता उच्चशिक्षण होती थोर।
दावाया ‘थारा ना विद्याविन’,
‘कृगोनि’ स्मरा त्यांचे उपकार।
या विश्वरत्न वंदायला ….।।५।।
निकोडे sir आपल्या या काव्य अभिनव रचना फार फार शुभेच्छा