◼️काव्यरंग :- ‘लाल बिंदू’ ✍️मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील  दि. २९/०८/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ‘लाल बिंदू’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे..

-ii लालबिंदू ii-

भूमातेच्या संरक्षणा
बाळ जा तू रणांगणा,
भिती नको कशाचीही
शौर्यपुत्र तुझा बाणा..!!१!!

हटू नको मागे कधी
छावा तू रे शिवबाचा,
ऊन असो वा पाऊस
सांड थेंब तू रक्ताचा..!!२!!

झेल बेहत्तर हल्ले
वाघावाणी छातीवरी,
डोळ्यात घालूनी तेल
उभा रहा सिमेवरी..!!३!!

लालबिंदू तुझा राजा
तारणार भूमातेला,
तिच्या रक्षणार्थ जरी
देह तुझा कामी आला..!!४!!

स्वातंत्र्य अग्नीकुंडात
हसत दे बलिदान,
खेळून रक्ताची होळी
राख देशाची शान..!!५!!

सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴

लालबिंदू

आहोत आम्ही भारताचे लोक
नाही देऊ विषमतेला थारा
देशाचा मान उंचावण्यास
एकतेची मशाल हाती धरा

दिले संविधानाने अधिकार
मनापासून करूया पालन
भेदभाव सारे विसरूनीया
नांदू सर्व गुण्यागोविंदानं

तिरंग्याचा आम्हांस अभिमान
घेतो आम्ही सारे त्याचीच आण
शरिरात असेपर्यंत लालबिंदू
वाहतो आम्ही देशासाठी प्राण

दया,क्षमा,शांती अमुच्या
नसानसात भिनलेले आहे
म्हणून नका समजू आम्हा कमजोर
वेळप्रसंगी बाहेरची वाट दाखवणार आहे

शिवरायाचे मावळे आम्ही सरदार
धारदार आहे आमची तलवार
वाकड्या नजरेने बघणा-यानां
दाखवू खास नरकाचे द्वार….

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह
🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴
लालबिंदू

बेहत्तर जरी समोर आला
शत्रू सैन्याचा विशाल सिंधू
लढूच जोवर असेल तोवर
देहात अखेरचा लालबिंदू…. //

शपथ तुझ्या दूधाची आई
मर्दन करू सार्‍यांचे रणी
एक एक ही लढूच प्रसंगी
करू शताशतांची खांडोळी… //

जमीन असो वा असो नभी
किंवा असो सागरी लाटांवर
भिडू हिम्मतीने तप्त वाळूत
किंवा या बर्फाच्या लाद्यावर… //

क्रूर काळालाही धाक घालू
दंडात अशी या धमक असे
ही नव्हेच पोकळ दर्पोक्ती
नसानसात या देशप्रेम वसे… //

देव, धर्म, अन् देशासाठी
तळहाती घेवू प्राण आंम्ही
तिरंग्याची राखू शान सदा
घेतली अशी आण आम्ही… //

एक विनंती देशबांधवानो
नका भांडू आपसात तुम्ही
लालबिंदू आईच्या मांडीवर
नका सांडू रक्ताचा तुम्ही… //

विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴🔰🔴

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

One Reply to “◼️काव्यरंग :- ‘लाल बिंदू’ ✍️मराठीचे शिलेदार समूह”

  1. श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम अर्जुनी/मोर.गोंदिया says:

    माझ्या लेखणीला टॉप थ्रि मधून दुस-यास्थानी मान दिले त्याबद्दल मी राहुल भाऊ आणि मराठीचे शिलेदार समुहातील संपूर्ण टीमचे तसेच सप्तरंगातील
    आयोजकांचे अंतःकरणातून आभार मानते.‌..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *