◼️ काव्यरंग :-  स्त्रीजन्म

-ii स्त्रीजन्म ii-

शेवटचा श्वास हा……
आई तू मला मिठीत घे…
विसरणार नाही, तुझे उपकार मी आई
स्त्रीजन्म पुन्हा घेऊ दे….

आई तुच माझी सावली
आई तुच माझा विसावा
पांघरुन पदराचा शेला
आई तू मला कुशित घे….
स्त्रीजन्म पुन्हा घेऊ दे….

शिवरायाची जशी जिजाई
तशी तू माझी प्रेमळ आई
जगाला तुझी ओळख देईन
आई तू मला निरोप दे….
स्त्रीजन्म पुन्हा घेऊ दे…..

चुकले कधी मी आई
प्लीज मला समजून घे…..
मांडीवर आई तुझ्या मला
शेवटची झोप घेऊ दे….
स्त्रीजन्म पुन्हा दे….


मो.7083335053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *