वैनगंगा नदीच्या पुराचा धोका वाढला ; 25 वर्षानंतर चा मोठा पूर

वैनगंगा नदीच्या पुराचा धोका वाढला ; 25 वर्षानंतर चा मोठा पूर

 

अनेक गावांचा तालुक्याची संपर्क तुटला, सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश

ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पुराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. 25 वर्षानंतर मोठा महापूर असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. यापूर्वी सन 1994 मध्ये वैनगंगा नदीला महापूर आला होता यात मोठी हानी झाली होती.

गोसीखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाचे पाणी विसर्ग होण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहेत वैनगंगा नदीला पाणी वेगाने वाढत असल्याने नदी तीरावरील गावात पूर परिस्थिती आणखी बिकट होत झाली आहे पुराच्या पाण्याने नदी काठावरील गावा सभोवताल वेढा घातल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असल्याने धान पीक भाजीपाला पिकांचे पूर्णता नुकसान झालेले असून जीवनावश्यक वस्तूचे ही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, खरकाडा (पिंपळगाव ), बेळगाव गावांचा तालुक्याची संपर्क तुटलेला असून बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे पिंपळगाव भोसले, अर्हेर-नवरगांव, रनमोचन, खरकाडा, बरडकिन्ही, बेटाळा, पारडगाव, बोळेगाव गावात पाणी शिरलेला आहे . आरमोरी ब्रम्हपुरी पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद झालेला आहे ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव, बेटाळा,किन्ही आवळगाव, बेलगाव- कोल्हारी, मालडोंगरी – ब्रह्मपुरी मार्गा वरील पुलावर पाणी चढल्याने ही मार्ग बंद पडले आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य प्रशासनाकडून जोमात सुरू असून नागरिकही मदत करीत आहेत.
आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे धान पीक बुडाली होती आता पुन्हा आलेल्या पुरामुळे धान पिक बुडाली असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पुरात झालेल्या हानीचा तात्काळ पंचनामा करून त्वरित मदत देण्याची मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *