आज रविवारी आता पर्यन्त चे सर्वाधिक  270 नवीन कोरोना रुग्ण, एकूण संख्या 2344 वर,

आज रविवारी आता पर्यन्त चे सर्वाधिक  270 नवीन कोरोना रुग्ण, एकूण संख्या 2344 वर,

चंद्रपूर, 30 अगस्त : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 2344 झाली आहे. गेल्या 24 तासात 270 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1224 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 1094 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1224 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 26 सह एकूण 23 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नवेगांव ता.मुल येथील 76 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 21 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले . कोरोनासह न्युमोनिया तसेच श्वसनाचा आजार असल्याने 29 ऑगस्टला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला . ( गेल्या 24 तासातील हा मृत्यु आहे )◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *