◼️ काव्यरंग :- मन वादर वारा !

मन वादर वारा !
[ झाडीबोली गीत ]

मन वादर हा वारा,फुकी सुडोरी गागऱ्या ।
कसा झाकलू झाकलू,तरी होये डोराभऱ्या ।।धृ।।

मन लेहळी लेहळी,कुपी टांगा टाकी शेरी ।
जसा माणोस वहढे,वऱ्या ठेवली सिदोरी ।।
मन डवूर डवूर,नाका टोंडी भपकारी ।
खुब डवालून येये,गळी पोटची वकारी ।।१।।

मन मुजोर मुजोर,आंगी हत्तीचे गो बळ ।
नेस गुंडत निंगते,जसी ते भांडकुदळ ।।
मन लावानं भक्तीत,वाढ होयेल सक्तीत ।
करा सेवा दुबळ्यांची,जागा भेटल मुक्तीत ।।२।।

मन तुजा पाणीदार,नोको देजो त्यालं वावू ।
जसा तळ्यात अडता,होये पिकांचा गा खाऊ ।।
जीव लागो कालापीसा,मना लावू गे चाबूक ।
बांद ‘कृगोनि’ होयेल,प्रेम दाव्याने भावूक ।।३।।

E-mail – nikodekrishnakumar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *