◼️ काव्यरंग :- सावित्री तू होतीस म्हणून..

*!! सावित्री तू होतीस म्हणून !!*


दगड,गोटे शेन,माती,घाण
सारं काही तू झेलत होतीस, पिसाळलेल्या कुत्र्यांशी तरीही
तू माणसासारखं वागत होतीस !!1!!

शाळा शिकवू नकोस म्हणून
दुनिया तुला रोखीत होती,
माणसं त्यांच्या मनातील घाण तुझ्याच अंगावर टाकीत होती !!2!!

सावित्रीमाई तू मात्र कधीच कुठं आयुष्यभर थांबलीच नाहीस,
स्त्री शिक्षणाचे धडे रात्रंदिवस
या जगाला तू देतच होतीस !!3!!

मोरावर बसलेली कोण ती बाई कधी आम्हाला दिसलीच नाही,खरी विद्येची देवता आणि देवी तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही !!4!!

बांडगुळांनी वाटेत काटे टाकले तरी तू चालनं सोडलंच नाही,
तुझी हिम्मत,धैर्य,धाडस पाहून काट्याची फुले होण्यास विसरले नाही !!5!!

सावित्रीमाई,तुला मारलेल्या साऱ्या
दगडांनी आज फुलेच झाली, त्याच दगडांना पाझर फुटला म्हणून सारी दुनिया साक्षर झाली !!6!!

खरा शिक्षक दिन आज जगभर सावित्रीमाई तुझाच झाला पाहिजे,खोट्या देवीचा तिरस्कार करून तुझ्याच चरणी लीन झालंच पाहिजे !!7!! 

 शिवश्री बाबुराव आडसूळ पाटील संभाजीनगर,(औरंगाबाद) मो. 9325294198

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *