अष्टविनायक आठवा
-ii रांजणगावचा श्री महागणपती ii-
भगवान शंकरांनी
मंदिर आहे वसवलेले
पूर्वाभिमुख आहे गणेश मूर्ती
सूर्यकिरण सकाळी येत असलेले
अष्टविनायक महागणपती
आद्य दैवत श्रेष्ठ
स्वयंभू स्थान असलेले
गणेशाला कमळाचे आसन जेष्ठ
त्रिपुरासुराचा वध केला शंकरांनी
गणेशाचे करुनी नमन
त्रिपुरारीवदे महागणपती
उजव्या सोंडेचा आहे गजानन
गणेशाला दहा हाते
प्रसन्न व मनमोहक मूर्ती
भव्य प्रवेशद्वार, बाजूला रिद्धी सिद्धी
दूरवर आजही आहे कीर्ती
मूर्ती मोहक सुंदर
अत्यंत आहे विलोभनीय
कोरोना संकट दूर होऊ दे
हे महागणपति विघ्नहर्ता शूरनीय