-ii मर्मबंधातली ठेव ii-
मर्मबंधातली ठेव काळजात जपलेली
तुझ्या प्रीतीची साठवणटिपलेली
अशीच राहू दे प्रीती मनातली
बहरुदे पुन्हा नाती स्वप्नातली
चांदण्या रात्री सजवलेली ती
स्वप्ने होऊन दिवा राहिली
प्रीतीची फुलेही आज अशी
ओंजळी कोमेजून हिरमुसलेली
प्रीतीचे महाल सखया बांधले
सजवली ती स्वप्ने ही कैक
गतकाळाच्या गर्तेत हरवली
विस्कटली नाती क्षणिक
तरीही आस आजही सखया
तुझीच हृदयी परम स्मरते
चिंब आठवात भिजूनी तुझिया
भवती उधाण अवतरते
जपतात नेत्र ती स्वप्न वाटेची
तूझिया फिरुनी परतण्याची
मर्मबंधातली ठेव ही जपते
हृदयांतरीच्या आठवणींची