◼️ काव्यरंग :- घेतो निरोप..

घेतो निरोप

भक्तांनो चाललो घरी
यंदा मी भरून पावलो
तुम्ही आवाहन करता
भूवरी भेटीस धावलो

नव्हता दाणदाण डीजे
अश्लिल फालतू गाणी
अकरा दिवस ऐकलीय
भक्तांची सुरेली वाणी

ढोल ताशे आणि बेंजोने
किटले नाही माझे कान
कोरोनाच्या संकटातही
भक्तांनी केला सन्मान

मोदक लाडू न् पेढ्यांचा
रोजच नैवेद्य गोडधोड
मूषकराजही हरकलेत
नाही केली काही खोड

वळवळ करून सारखा
दिला नाही त्यांनी त्रास
आज निरोप घेतानाच
होतो जड माझा श्वास

घंटीच्या किनकानाटात
रोजच केली पूजाअर्चा
कानावर फक्त यायच्या
कोरोनाबाबतच्या चर्चा

सांभाळून राहा भक्तांनो
होईलच कोरोनाचा नाश
आवळलाय मोठा तिढा
मृत्यूचाच दारूण पाश

लावाच मास्क तोंडाला
हातां सॅनिटायझर चोळा
काय बिशाद विषाणूची
फिरवू त्याच्यावर बोळा

रोगाच्या भीतीनेच तुम्ही
माणसासारखेच वागला
आशा करतो मी दरवर्षी
ठेवा आचार हो चांगला

सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *