◼️ काव्यरंग :- हतबल..

हतबल….

आता प्रत्येक आरोप-प्रत्यारोप मी सहन करून घेतो आहे 
इतक्यात चेहरा माझा मी लपवून फिरतो आहे…

विनाकारणच माझ्या निरपराध जागेवर
दंडा बसला तेव्हापासून,
थोडा बेईमान, थोडा लाचार मी होऊन जगतो आहे…

जोमात आहे धंदा? आणि म्हणे आम्ही सेवा करतोय?
मग दरिद्रीच्या स्वाभिमानाचा गळा,झोप
मी आवळून धरतो आहे…

आंधळे झाल्यागत ते साले आमच्या भाळावर
लाथ मारून चालले आहेत,
आणि दारा समोर वाहणाऱ्या नपुंसकतेच्या प्रवाहात
मी(?) ही खळखळून वाहतो आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *