◼️काव्यरंग :- पांडुरंग

*ll पांडुरंग ll*

तुका म्हणे सकळाजन,
वैष्णवांचे कुळ ll
अभंगाचा सूर ….ll पांडुरंग ll

संसाराचे सुख,
भाकरीची भूक ll
अमृताचे दान …. ll पांडुरंग ll

आसक्तीचा रोग
कर्माचे भोग ll
घडे योगायोग …. ll पांडुरंग ll

बंद राऊळी दार,
झाला हाहाकार ll
पुरे सोपसकार …. ll पांडुरंग ll

अहंकाराचे रूप,
अविवेकाचे घर ll
दूर भक्तीचे द्वार …. ll पांडुरंग ll

अमृताचे जीवन
हरिचरण धूळ ll
घडे साक्षात्कार …. ll पांडूरंग ll

सरला मन विकार
साधले जन्म मूळ ll
घडला परमार्थ …. ll पांडूरंग ll

चक्रपाणी कर नमन
लाभे दर्शनाचे सूख ll
फेरा जन्म-मरण …. ll पांडूरंग ll

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *