◼️ काव्यरंग :- स्मारक

 स्मारक

दुष्काळ पडल्यामुळे,कसं राहायचं खेड्यात
म्हणून ठरवलं होतं,जाऊ आता शहरात
बायका,पोर,कपडालत्ता समद घेतलं बरोबर
मुंबईची गाडी पकडून जाऊन पोहोचलो स्टेशनवर
स्टेशनवर उतरल्यावर,पाहिली गर्दी सारी
वाटलं होतं मुंबई,असं लय भारी
गावाकडे असताना माहीत नव्हतं मला भ्रष्टाचाराचं घर
मुंबईत येताच मात्र,येऊन उभ राहिल समोर
खेड्यावाणीच शहरात बी,पाण्यासाठी होत होती मारामारी
आणि इथं प्रत्येक चेहरा बोलतो,मी तुझ्यापेक्षा लय भारी
मग मनाशीच ठरवलं,नाही राहायचं इथं
जन्म जिथं घेतला,मरण येऊ दे तिथंच
गाडी धरण्या गावाची,आलो होतो स्टेशनावर
गोळ्या येऊन धडकल्या,सपासप माझ्या देहावर
गावाकडे जाऊन मरण्याचं,माझं स्वप्न राहिलं अर्ध्यावर
मरण जरी इथ आलं,तरी स्मारक बांधा चावडीवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *