◼️ काव्यरंग :- कोरोन्याचा कहर पसरतोय

कोरोन्याचा कहर पसरतोय

कोरोन्याचा कहर पसरतोय
मात्र महापूर ओसरतोय
मृत्यूदर किमानतेने वाढतो
तरी जीव आत बाहेर होतोय !!

जे नुकसान वायचे ते झाले
किती मेले किती वाचले
डॉक्टर विठ्ठलासारखे धावुन
निधड्या छातीत पडसाद झेलले !!

बसला जोरदार फटका
अग्नीपेक्षाही तीव्र चटका
तालुकानिहाय जिल्हानिहाय
गाव देश मोजते दुर्घटना घटका !!

आंतरजिल्हा प्रवास सुरळीत
ई पास कोणी नाही पुसत
बंदीचे नियम शिथिलले जरी
एसटीत अंतरावर बसा लागत !!

प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *