◼️ काव्यरंग :- वसुधैव कुटुंबकम

वसुधैव कुटुंबकम

समाज माझा असा हवाय
जिथे जात-पात नसेल
सर्वांची जात मात्र
भारतीय असेल

मानवतेचा धर्म
साऱ्या धर्मा हुनी श्रेष्ठ
वसुधैव कुटुंबकम
संदेश आहे हा जेष्ठ

समतेची भावना ठेवू
जात-पात धर्म संप्रदाय छान
प्रभूची लेकरे आम्ही
सर्वांचा पिता ईश्वर आहे महान

संतांची ही भूमी
एकता बंधुतेचा संदेश देऊ
हिंदू-मुस्लीम भेदभाव विसरून
वसुधैव कुटुंबकम भावना मनी ठेवू

उच्च निच्च कोणी नाही
माणुसकी ठेऊ मनी
सर्वधर्मसमभावाची भावना
विकासाची गंगा ध्यानी

हे विश्वची माझे घर
ऋषिमुनींनी दिली शिक्षा
धरतीच्या चरणी
एकजुटीची घेवू दीक्षा

सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *