◼️ काव्यरंग :- व्यथा इवल्यांची..

व्यथा इवल्यांची..

मोकळे पडलेत बाक
अन पुसलेला फळा
पुसती इवलाली रोज
कधी सुरू होई शाळा

खेळायचेय मित्रासंगे
शिकायचे नवीन पाठ
करु अभ्यास गृहकार्य
घालून परीक्षेशी गाठ

नको वाटतेय हे जीवन
झालोय कधीचे बंदिस्त
शाळेत जायचेय रोजच
जीवनच झाले उध्वस्त

खूप झालेय कोरोनाचे
त्रासिक जीवघेणे खेळ
वर्ष आमचे वाया गेले
सरतोय मौल्यवान वेळ

नवीन कोरी पुस्तकेही
खुणावतात रोज मला
वह्यांतुनी गणिताचाही
खेळ सुरू करू चला

विनंती करतोय आम्ही
करा आता शाळा सुरू
नको ऑनलाइन शाळा
भेटतील शिष्य नि गुरु

सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *