सध्या मी
सध्या मी विझलेला आहे
थोडा भिजलेला आहे
शांत असुनही,भयान खिजलेला आहे…
दृष्टीसापेक्ष वास्तविकता आहे
तरीही मी निजलेला आहे
पण बर्फाच्या गादिखाली
मी पेटलेला आहे…
सध्या मी रूसलेला आहे
संदिग्ध आहे
मी अबोलही आहे
विचारांच्या गर्तेत बुजलेलो आहे
वर्तुळाचा मी वलय झालो आहे…
सध्या मी आंधळा आहे
पाय असून पांगळा आहे
तरीही स्वप्नात सूर्यभूमिवर मी
धावण्याची शर्यत लावली आहे…
सत्यता हिच माझी अस्मिता आहे
पण सध्या माझा इतिहास रिता आहे…
◼️ खुशाब लोनबले, पवनपार, सिन्देवाही ,
चंद्रपूर -९६८२१३००८५