” नातं “
असंच असतं शिक्षकाचं विद्यार्थ्यांशी नातं;
जशी इतरांना प्रकाश देण्यासाठी जळते समईतली वात,
अडचणींच्या प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना शिक्षक देतात हात;
भूक लागल्यावर लेकराला भरवते जशी आई दूध-भात,
विद्यार्थ्यांमधील कलागुणांचे शिक्षकांना असते भान;
पालकांना सुद्धा करून देतात,शिक्षक त्यांची जाण,
वर्षानुवर्ष शिक्षक-विद्यार्थी नातं जडतं; पाखरू मात्र पंख फुटल्यावर घरटे सोडून उडतं,
आठवणी राहतात विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांच्या देखील मनात;
जशी बोटांवर रंग सोडून फुलपाखरं उडून जातात रानात.
कवी= श्री. दीपक सुरेश सहाणे
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर, नाशिकरोड, नाशिक. 8378937746