◼️ काव्यरंग :- क्षणोक्षणी

💕➖क्षणोक्षणी➖💕

जन्मोजन्मीच्या दुःखाचं ओझ पाठीवरती मिरवताना
दुःखातही हसते माझी आई
म्हणून तर तिच्यात मला
दिसते पंढरीची विठामाई…

क्षणोक्षणी ईमानदारीच रक्त आमच्या
नसानसात तीनच भिनवलय
अन् शेमामातीच्या, चारभिंतीच्या घराला
तीनच पंढरी बनवलय…

म्हणून मला पंढरीला जायची
गरज आता वाटत नाही
कारण पंढरीच्या गाभाऱ्यात
मला विठ्ठल भेटत नाही

विठ्ठल भेटतो तो
दिवसरात्र मरमर मरणाऱ्या
माझ्या कष्टकरी बापात,
अन् पहाड्या छातीच्या
धिप्पाड देहाच्या रुपात

मी रात्री निश्चिंत झोपाव म्हणून
आई रातभर उशाशी जागते,
अन् भर उन्हात राबताना
तिच्या अंगातून
घामाची चंद्रभागा वाहते

म्हणून बापचं माझा विठ्ठल आहे
आईचं माझी रखुमाई
म्हणून तर पंढरीच काय
चारीधामाच सुखही
भेटत त्यांच्या पायी

 

◼️✍️ कार्तिक रामदास झेंडे
इयत्ता – दहावी,अ.नगर 
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
➖➖➖➖♾️➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *