गुरू
ज्ञान देऊन जयांनी
केले उपकृत जना,
गुरु विना नाही मोक्ष
जाण ठेवू नित्य मना…
गुरु असे कनवाळू
घेतो सांभाळून मला,
किती वर्णावी महती
तया अंगी नाना कला…
येता कितीही संकटे
साथ देती गुरुवर्य,
शब्द पडती अपुरे
त्यांचे इतुके हो कार्य…
जीवनाचा मार्गदाता
अनुभव मोठा गुरु,
देतो सदैव सावली
जसा देई कल्पतरु…