◼️ काव्यरंग :- शिक्षक

शिक्षक

ज्ञान देण्या जगा
गुरू असे सर्वांना
नाही मोक्ष गुरु विना
नित्य जान ठेव मना ।

शिक्षक असे मायाळू
सांभाळून घेई मुला
किती वर्णावी कीर्ती
त्यांच्या अंगी नाना कला ।

संकटी येता स्मरती प्रती
भिऊ नकोस मी पाठी
वचन हे देती सदा सर्वदा
गुरू आपल्या शिष्यांसाठी ।

आई आदर्श गुरू सर्वांचा
शिक्षक ज्ञानदान करितो शिष्यांना
शेवटी ज्ञानदान हे सर्व श्रेष्ठ कार्य
आजच्या दिनी प्रणाम शिक्षकांना।

शब्दांकन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *