◼️ काव्यरंग :- गुरू महिमा ✍️सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि ०५/०९/२०२० रोजी ‘शिक्षक दिनानिमित्त‘ घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ‘गुरू महिमा’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.
➖➖➖➖👏✍️👏➖➖➖➖
गुरू महिमा

भविष्याचा कर्ता धर्ता
आयुष्याचा दिशा दाता
कसा वर्णावा गुरूमहिमा
हा झुकतो आमुचा माथा… //

त्या निर्णायक वळणावर
जर भेटला नसता तुम्ही
हिन दीनच अजून असतो
सार्‍या विद्येवाचून आंम्ही… //

अक्षर ओळख करून दिली
वदवून घेतलात बाराखडी
कधी पाठीवर कौतुक थाप
कधी हातावर देवूनी छडी.. //

सुंदर शिल्प दगडातूनी
घडवी जसा शिल्पकार
कर्दम गोळ्यातूनी कुंभार
जसा देई मातीस आकार… //

तसेच तुम्हीही किमयागार
दिले आम्हा आचार विचार
या गूढ गहन विद्या सागरी
नौका आमुची केलीत पार… //

व्हावे तरी कसे उतराई
हे जन्मांतरीचे ऋण असे
आजन्म राहू कृतज्ञ आम्ही
श्वासात तुमचे स्मरण वसे… //

मस्तक आमुचे सदा झुकावे
गुरूजी तुमच्याच पायावर
आशिर्वादांची भरली ओंजळ
रितीच व्हावी या माथ्यावर… //

विष्णू संकपाळ, बजाजनगर, औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘
गुरू महिमा

गुरू महिमा आहे थोर
काय वर्णू मी पामर,
कधी फणसाचा गर
कधी करी वज्र प्रहार.

गुरू ज्ञानाचा सागर
सारी अज्ञान तिमीर,
करी मनावर संस्कार
जीवनास येई बहर.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
निर्मळ प्रवाहाची धार,
कर्णापरी तो उदार
आयुष्य बनवी चवदार.

गुरू असे आईचा पदर
कधी फुल कधी अंगार,
गुरू कलम अन् तलवार
विपत्तीचा गिरी करी पार.

दीप पेटवूनी निरंतर
करी सकला साक्षर,
राष्ट्राचा हो शिल्पकार
तुजला नमन त्रिवार…
तुजला नमन त्रिवार…

सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दा.न.ह.
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘
गुरू महिमा

संत महापुरुषांना माझ्या
करितो त्रिवार मी वंदना
आचरणातून आमच्या दीसावा
आमच्या गुरूंचा महिमा..

बदीलान संताचे पावन या भुवरी
सप्तरंगी ,विचारांची धगधगते ज्वालामुखी.
प्रसार व्हावा दाही दीशी शुध्द विचारांचा
आचरणातून आमच्या दिसावा
आमच्या गुरुंचा महिमा..

आचरणातून आमच्या दीसावा
शिवछत्रपतींचा वारसा
डाँ.आंबेडकरांच्या समानतेचा
जगी दावू आम्ही खरा आरसा
आचरणातून आमच्या दिसावा
आमच्या गुरूंचा महिमा..

बुध्द आमुचा , विठ्ठल हि आमुचा
देती विचारांची गोड भावना..
टाळ मृदंगाच्या तालावर
नाची ईथे भाविक सारा.
आमच्या आचरणातून दिसावा
आमच्या गुरूंचा महिमा..

माँ. जिजाऊ, माँ ,
रमाई , माँ सावित्रीचे आम्ही लेकरे.
विचारांच्या लढ्यात आम्ही
सदाच जिंकू नेकरे.
सदाचार , बंधूभावाचा विणूनी
आपन सप्तरंगी एकच धागा.
आमच्या आचरणातून दिसावा
आमच्या गुरुंचा महिमा…

अभिजीत के. ठमके
वरोरा , जि. चंद्रपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘✍️📘

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *