◼️ काव्यरंग :- बाप

आजी आजोबांची म्हातारपणची काठी
चुलते करतात सगळया वाटाघाटी
आत्या म्हणे भाऊराया माझ्या पाठी

ईथून तिथून सतत कर्ज काढतो
याची टोपी त्याला करतच राहतो
कुटूंबाकरिता रात्रंदिवसच राबतो

नेहमी आईचा विचार, सल्ला घेई
लेकरांवर प्रेम करी मनापासुन लई
रागावल्यावर मग खुप मार ही देई

जिवनात पेलतो असंख्य जबाबदारी
बरेचसे दुःख साठवी ह्रदय मंदीरी
ताईच्या पाठवणी प्रसंगी रडे अंतरी

शेतकरी , साहेब असो की ,राजकारणी
संसारासाठी करी अनेकांची मनधरणी
बाप पाठीशी असे उत्तुंग हिमालया वाणी

◼️✍️ कवी – राजेंद्र उदारे, मो. ८६२३९९०८०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *