◼️ काव्यरंग :- शिक्षक

शिक्षक

शिक्षक म्हणजे ज्ञानाची खाण
ज्ञानाचा अथांग सागर,
ज्ञानाअमृत देऊनी साऱ्यांना
रिती करी संस्कारांची घागर.

शिक्षक असतात सर्वगुणसंपन्न
देतात कलाटणी आयुष्याला,
समानतेची देऊनी शिकवण
देती आकार उज्ज्वल भविष्याला.

अखंड ज्ञानदानाचे कार्य करतात
मनी नसतो स्वार्थी विचार,
नवविचारांचे करतात रोपण
देती उच्च विचार योग्य आचार.

देश विकासासाठी परिश्रमाने
निर्माण करतात असंख्य बुद्धिवान,
आदर्श समाज घडविण्यासाठी
देतात बहुमूल्य योगदान.

महामारीच्या काळातही नवऊर्जेने
चालवतात ऑनलाईन शाळा,
नवं तंत्रज्ञानाचा करुनी वापर
देती शिक्षण सर्व बाळा.

शिक्षकांचे कार्य महान
मज त्यांचा अभिमान,
देती दर्जेदार शिकवण
प्रत्येकात निर्माण करती स्वाभिमान.

◼️✍️  राज पवार, रत्नागिरी
मो. नंबर.- 8605962976

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *