◼️ काव्यरंग :- मन

-ii मन ii-

मन माझं साधंभोळं
किती जपलं जपलं
आज झालं गं फितूर
माझं मला अंतरलं !

मन माझं गं खट्याळ
आवरता आवरेना
थांब थांब म्हणताना
हातोहात निसटलं !

मन फुलपाखरु वेल्हाळ
झालं वार्‍यावर स्वार
पंख फुटता फुटता
बघ उडालं उडालं !

मन माझं ग चपळ
जसा ससा नि हरीण
पुढे धावता धावता
मागे हळूच पाहिलं !

मन गंगा गं निर्मळ
वाहत असे खळखळ
हिमालयाच्या कुशीत
अलगद विसावलं !

“प्रिया प्रकाशची”
सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *