◼️ काव्यरंग :- माझं मन..

माझं मन….असंच आहे.

माझं मन..असंच आहे, कधी ते..
समुद्राच्या अथांग अशा निळाभोर पाण्यात;
सागराचा तळ शोधण्यात दडलेलं असतं,
कारण माझं मन…….असंच आहे.

तर कधी ते….
विशाल अशा आभाळामागे धावून;
क्षितिज गवसण्यात दंग असतं,
कारण माझं मन…असंच आहे.

कधी ते…
वाळवंटातल्या रखरखत्या उन्हात;
पाण्याचा थेंब सापडण्यात गुंग असतं,
कारण माझं मन…….असंच आहे.

तर कधी ते…
थंडगार बर्फाळ प्रदेशात;
सूर्यकिरण धुडाळण्यात व्यस्त असतं,
कारण माझं मन…….असंच आहे.

कधी ते…..
माणसांच्या दुनियेत;
माणुसकी शोधण्यात व्यस्त असतं,
कारण माझं मन…….असंच आहे.

कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे.
( तरंग कवितासंग्रह )
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर,
नाशिक रोड,नाशिक.
संपर्क-8378937746.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *