शिक्षक दिननिमित्त “Thank A Teacher” मोहीम पं.स. यवतमाळ द्वारा आयोजन

शिक्षक दिननिमित्त “Thank A Teacher” मोहीम पं.स. यवतमाळ द्वारा आयोजन

यवतमाळ :- दि ५ सप्टे रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून Thank A teacher अभियान अंर्तगत शाळा बंद पण शिक्षण सुरु. Thank A Teacher”मोहीम
पं.स.यवतमाळ द्वारा आयोजीत करण्यात आले. या उपक्रमासाठी लाभलेले तंत्रस्नेही, मु.अ.,शिक्षक, साधनव्यक्ती, मोबाइल टिचर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच कोवीड काळात ज्यांनी आपले योगदान दिले त्यांचा सुद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून शा.व्य.समिती अध्यक्षा भारकर ताई तर प्रमुख पाहुणे मा.गटशिक्षणधिकारी खोब्रागडे साहेब आणि विशेष अतिथी म्हणून वि.अ.मा.वंजारी मॅडम, केंद्रप्रमुख मा.काठोळे सर तसेच
शा.व्य.समिती सदस्य कनाके सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली गायकवाड साधन व्यक्ती तालुका समन्यवयक सदर कार्यक्रमात
निलेश जयसींगकार अश्विनी वास्कर, दिनेश डहाके ,शिवचंद्र गिरी, स्वाती पवार, वैजयंती भेंडारकर यांचा शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमात तंत्रस्नेही म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोवीडयोध्दा म्हणून मिना सांगळे, गजानन बेलखेडे यांचा सत्कार करण्यात आला.
उपक्रमाची धुरा सांभाळणारे वैशाली गायकवाड, अमित गावंडे, प्रशांत लाकडे, विजय पातोडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत करणारे सर्व BRC टीमचे याठिकाणी सन्मान करण्यात आला. तसेच लोहारा शाळेतील सर्वच शिक्षक हे सुद्धा अविरत मेहनत घेत आहे, त्यां सर्वच शिक्षकाचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.वंजारी मॅडम यांनी केले यामध्ये संपूर्ण रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली. तर मा.काठोळे सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विषद केले. मा.खोब्रागडे साहेब यांनी आपल्या मौलिक शब्दांत आपले शिक्षण व शिक्षक याविषयी मत मांडले. मा.भारकर ताई यांनी अध्यक्षीय भाषणात online चा वापर करून मुले शिकत आहे, याचे समाधान व्यक्त केले.
आणि सरतशेवटी आभार अमित गावंडे,साधन व्यक्ती यांनी केले अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *