◼️काव्यरंग :- कावळा ✍️सौ. भारती सावंत, मुंबई

कावळा

कावळा रंगाने काळा
परंतू उपयोगीच फार
करतो परिसर स्वच्छ
जणू आकाशीची घार

बाळालाही रिझवितो
डाळ न् भात भरवता
घास चिऊकाऊचा तो
सगळीकडे फिरवता

हाकलती सारे त्याला
सदा करतो काव काव
चोरून नेतो पटकन
खाण्याचीच ठेवून हाव

श्राद्धपक्षाचे वेळेलाच
कावळ्याला आमंत्रण
पितृरूपाने कावळ्यास
भरवतो सुग्रास भोजन

शिवता नेवैद्य पितरांचा
टाकतो आम्ही निश्वास
नाही शिवला नेवेद्य जर
अडकतो आपला घास

◼️✍️.  सौ. भारती सावंत, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *