अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांचा झुम मिटींग द्वारा गौरव सोहळा

अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांचा झुम मिटींग द्वारा गौरव सोहळा


आनंदाची पर्वणी व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती चे औचित्य साधूनअग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे उपक्रमशील शिक्षकांना शिक्षक दिनी गौरविण्यात आले. 27 जुलै 2020 रोजी डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 5 व्या पुण्यतिथी निमित्य विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यातील विजत्या शिक्षकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक देऊन शिक्षक दिनी ऑनलाईन बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद कुबळे, प्राचार्य जि. शि. व प्र. संस्था यवतमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून मा दीपक चवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ,मा. नितीन भालचक्र अधिव्याख्याता, मा. दीपक मेश्राम, अधिव्याख्याता, मा.डॉ. राजेश डहाके गो सी गावंडे ऊमरखेड उपस्थित होते. सर्व स्पर्धक शिक्षकांची निवड करण्याचे निवड समितीचे सदस्य मा.ओमकार चेके, मा.राम राठोड, मा. महेश कुमार यांनी केले, सर्व पाहुण्याच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील सन्मानित केलेल्या शिक्षक बंधू भगिनींमध्ये गडचिरोलीच्या रोशनी दाते, नरेश रामटेके,जयश्री खोंडे, निलेश गिरडकर, यवतमाळचे संदीप कोल्हे, धुळेचे अविनाश खैरनार,हेमराज अहिरे, अविनाश पाटील, गोंदियाच्या सिंधू मोटघरे, हुमेन्द्र चांदेवार, भारती तिडके, राजेंद्र बन्सोड, साताराच्या राजश्री कांबळे, जालनाचे दत्तात्रय गव्हाणे,भंडाराचे दामोदर डहाळे, मंजुषा नंदेश्वर, जळगावचे सुशांत जगताप, दांडाईचे पुंडलिक भिलाने तर दिपाली गवळी, चेतन पाटील,प्रिया,दिव्या,संजीवनी आणि वेदांत चौधरी या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन जयश्री सिरसाठे महिला राज्यसमनवयक , आयोजन गजानन गोपवाड राज्यसमनवयक हे होते. प्रास्ताविक सुवर्णा सातपुते, तंत्रज्ञान सांभाळणी ऋतुजा कसबे यांनी तर आभार अश्विनी वासकर यांनी मानले. अशाप्रकारे कोविड 19 च्या काळात ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *