◼️ काव्यरंग :- बंद कवाडे

बंद कवाडे

माझ्या मना तू बोल ना!
बंद कवाडे खोल ना!!
गुंतले रे मन माझे..
सांगू कसे कळेना…
वेडावे तुझ्यामध्ये
फिरूनीया वळेना…
माझ्या मना तू बोल ना!
बंद कवाडे खोल ना!!..१
मनी पिसारा चांदण्यांचा
नभांगण सारे सजले
सहवासात तुझ्या
गोड गुपित उमजले…
माझ्या मना तू बोल ना!
बंद कवाडे खोल ना!!…२
मन किती सैरभैर
पळती किती भरभर
चाल त्याची झरझर
फिरतेय बघ गरगर
माझ्या मना तू बोल ना!
बंद कवाडे खोल ना!!…३

•••••••••••○•••••••○••••••○••••

श्रीकांत दीक्षित, शाहूनगर, पुणे
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
••••••••••••••••••••○•••••••••••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *