मतदान माझा हक्क
ऐक मतदार राजा
नको भुलू कशालाही,
मारतील खोट्या बाता
बधू नको कुणालाही…
लोकशाही भारताची
जगी आहे सर्वश्रेष्ठ,
तुझा मतदान हक्क
नको मानू तू कनिष्ठ…
रोज पक्ष बदलती
स्वप्ने यांची फार भव्य,
स्वहितास येथे नेते
आद्य मानती कर्तव्य…
चढाओढ नेत्यांमध्ये
त्यात जनतेचे हाल,
खोटी सारी आश्वासने
होते आयुष्य बेहाल…
घ्यावे ओळखून त्यांना
आता सत्वर जनाने,
देऊ मत हो आपले
योग्य विचारी मनाने…
राज्य आणण्या लोकांचे
योग्य बटण दाबूया,
मतदान माझा हक्क
चला आता बजावूया…
© सौ.गौरी ए.शिरसाट, मुंबई