◼️ काव्यरंग :- बदल घडवीत रहा !

बदल घडवीत रहा !

मनातले विचार पानावर ऊतरवीत रहा
वेळेनुसार स्वत:मधे बदल घडवीत रहा !

नका घाबरू, अंधाराला दूर सारतच रहा
सूर्याचे पहिले किरण होऊन पसरत रहा !

कुणी मागे असले-नसले वाट पाहणारे
दिवस मावळण्यापूर्वी घरी परतत रहा !

समुद्राची खोली मोजायची कशाला
नदी होऊन सागरात सामावत रहा !

एक दिवस नक्कीच येईल आपलाही
भरवसा हा सदैव मनी बाळगून रहा !

◼️✍️”प्रिया प्रकाशची”
सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *