◼️ काव्यरंग :- _आयुष्याच्या वाटेवर_

_आयुष्याच्या वाटेवर_

यश मिळवत असतांना;
थोड अपयश पचवायचं असतं,
खडतर रस्ता चालतांना मात्र ;
खड्ड्यात पडून राहायचं नसतं,

शून्यातून विश्वाकडे उंच भरारी;
मारायला जायचं असतं,
आयुष्यात मोठी स्वप्ने पाहतांना मात्र ;
वास्तवाला कधी विसरायचं नसतं,

नवनवीन संधीच्या शोधात;
मनाला व्यस्त ठेवायचं असतं,
चालून आलेल्या संधीला मात्र ;
कधी दवडायचं नसतं,

नदीतल्या पाण्यासारखं;
खळखळत व्हायचं असतं,
आपल्या शत्रूशी लढतांना मात्र ;
कमी त्यांना लेखायचं नसतं,

माता-पित्याच्या घामाच्या परतफेडीपर्यंत मात्र ;
आपलं जीवन असंच जगायचं असतं…
माता-पित्याच्या घामाच्या परतफेडीपर्यंत मात्र ;
आपलं जीवन असंच जगायचं असतं…

कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे.
( तरंग कवितासंग्रह )
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर,
नाशिक रोड,नाशिक.संपर्क-8378937746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *