◼️ काव्यरंग :- धरतीचा आरसा

धरतीचा आरसा

जर का धरती आरसा असती,
मौज किती दिसली असती!

एकाचे दोन जग भासले असते,
एक सुलटे दुसरे उलटे!

सर्व काही दोन दोन दिसले असते,
नभ मेघ सूर्य चंद्र ग्रह तारे!

पावसातही गंमत वाटली असती,
थेंब पडती तितकेच उडती!

पायाने व डोक्याने चालणारे,
साऱ्यांचे एकरुप दोन चेहरे!

सर्व घरांना खुलले असते,
दोन बाजूस दोन टिब्बरे!

काहींचे शेंडे वर काहींचे खाली,
झाडे झुडपे एका बुडाची!

पतंगाप्रमाणे डोंगर-रांगा,
अधांतरी तरंगल्या असत्या!

उठता बसता खाली बघण्यात,
लहान मोठे हरखले असते!

धरणी मातेच्या स्वच्छ आरशात,
टापटीप सारेच राहिले असते!

आपले रुप आपल्या समोर,
आत्मदर्शित झाले असते!

चुकूनही बट्टा मज न लागो,
‘कृगोनि’ दक्ष वागले असते!

◼️✍️◼️
कवी : – “कृगोनि” –
श्री कृष्णकुमार जी. निकोडे,
मु. काटली, पो. साखरा,
ता. जि. गडचिरोली.,मोबा. ९४२३७१४८८३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *