◼️ काव्यरंग :- सनई -चौघडा

सनई -चौघडा

आयुष्याच्या उताराला
खेळून झाली जिद्द….
वाकला पाठीचा कणा
म्हातारपणाची ही हद्द…

आवाजात दम नाही
राहिला फक्त दमा ….
केलेल्या कर्माला
उरली नाही क्षमा..

नाही तो नजर तीक्ष्णपणा
तत्परता नाही कामाची…
राहिली फक्त अनामिक भीती
न संपणाऱ्या व्याधींची

फिरतो या वयात वणवण
घरी नाही दुसरं कुणी….
जमेना मुलीचं लग्न
आहे तिला मंगल शनी

हवा तिला मंगळाचाच नवरा
समाजाची ही चालीरीती…..
कधी वाजेल सनई-चौघडा
बाशिंग तिच्या कपाळवरती

येईल कधी सोनियाचा दिन
सनई चौघडा येता दारी ..
हर्ष होईल थकलेल्या मनाला
मुलगी जाईल तिच्या सासरी

©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *