रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या बालकाला बिबट्या/वाघाने नेले उचलून

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या बालकाला बिबट्या/वाघाने नेले उचलून

शेकडो लोकांनी शोधल्यावर बालकाचा मिळाला मृतदेह

सावली :- सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला बिबट या वाघानी ने उचलून नेल्याने त्याचा शोधार्थ शेकडोजण जंगलात गेले आणि शोधकार्य केले असता त्या बालकाचा मृतदेह च मिळाल्याने एकच हंबरडा त्या बालकाच्या आईने फोडला . सावली तालुक्यातील कापसी येथे आज पहाटे 5 च्या दरम्यान फिरायला गेलेले काही बालक व युवक हे रस्त्यावर व्यायाम करीत असतांनाच संस्कार सतीश बुरले वय 10 वर्ष याला बिबट अथवा वाघाने उचलून नेल्याची चर्चा सुरू होती त्या बालकाच्या शोधार्थ गावातील शेकडो जण जंगलात गेले असून शोध कार्य घेत असतांनाच त्या बालकाचा प्यांट मिळाल्यानंतर व पुन्हा समोर शोधकार्य घेतले असता त्या बालकाचा मृतदेह मिळाला आहे . या प्रकारणची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आलेली आहे . बिबट की वाघा ने त्या बालकाला उचलून नेले हे अजून पर्यंत कळले नसले तरी या परिसरात मोठ्या प्रमानात बिबट व वाघाचा वावर आहे. कापसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून त्वरित बिबटया व वाघाचे बंदोबस्त करावे अशी मागणी कापसी वासियांनकडून केली जात आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *