◼️ काव्यरंग :- अभंग ग्रामदेवतेचा..

मोठा अभंग

अभंग ग्रामदेवतेचा

करिते नमन |आद्य गणेशाला|
ग्रामदेवतेला |नाथबाबा||

सुखाची सावली | पांढरीत वास |
नैवेद्याचा घास | देती जन ||

सणसोहळ्याला |जमती ग्रामस्थ
गावाचे विश्वस्त| सभेमध्ये ||

येती गाववाले | गावाच्या जत्रेला |
देवाच्या यात्रेला | आनंदाने ||

भजण्या देवाला |कीर्तन अभंग|
होती सारी दंग || जयघोष ||

दिधले जीवन |देवाचीच कृपा |
दुर करी पापा | पिडीतांच्या ||

हरिपाठासंगे | होई पारायण |
सुक्त रामायण | मंदिरात ||

राहती गोडीने| सारे गावकरी|
करती नोकरी | शहरात ||

राबती योजना | ग्रामविकासाची |
या रहिवासाची | उत्कर्षाची ||

◼️✍️◼️

सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *