◼️ काव्यरंग :- पराकाष्ठा..✍️सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि.०९/०९/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘पराकाष्ठा’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

-II पराकाष्ठा ii-

नका बनू दुबळे दैववादी
करा प्रयत्नांची पराकाष्ठा
बनावे निष्काम कर्मयोगी
असावी अचल ध्येयनिष्ठा… //

जसे पेरावे तसेच उगवते
हाच अटळ निसर्ग नियम
निर्भेळ यश प्राप्तीसाठी
असावा सदा कठोर संयम.. //

आठवा कोलंबस दर्यावर्दी
जो लाटावरती झाला स्वार
त्याच्या उत्तुंग पराकाष्ठेचा
भाळावरती नव्हताच भार… //

शिवा, संभा, राणा प्रताप
हस्तरेषेंचे नव्हते जाणते
बुद्धी,शक्ति,युक्ती मिलाप
ते बाहूबलाचे होते प्रणेते… //

जिद्द ज्याच्या उरात असते
प्रकाशाकडे झेपावण्याची
तेच रोपटे ठाम उभे राहते
पाषाणाच्या छाताडावरती… //

प्रवाहासोबत वहात जाणे
यात मुळी पुरूषार्थ नसतो
प्रवाहा विरूद्ध पोहत राहणे
हा सामर्थ्याचा संकेत असतो.. //

🔷 विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃
◼️ पराकाष्ठा ◼️

पराकाष्ठा नित्य
केली माय बापे
गेली दूर पापे
पळोनिया//1//

कामावर निष्ठा
सदा त्यांची असे
समाधान वसे
ठायी ठायी//2//

सर्वत्र ईश्वर
त्यांनीच पाहीला
कष्टाने वाहिला
देह त्यांचा//3//

भाग्य किती थोर
बाप माझा देव
मनी नसे भेव
कलीयुगी//4//

पवित्र मंदिरी
माय माझी भक्ती
पाठी बाप शक्ती
नित्यनेम//5//

सत्कर्मे सुयोग
कष्टाचेच फळ
कामे येई बळ
पराकाष्ठे //6//

श्री पौळ विनायक सर,पालम,परभणी
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃
🔷 पराकाष्ठा 🔷

कैक जख्मा झाल्यात

या धरणीच्या शिरी
लाखो कहानी बलिदानाच्या
दडल्यात तयाच्या उरी
होती बंधने गुलामीची
होती विकृत माणुसकी
संस्कृतीच्या नावाने विकली
जात होती माणुसकी
होऊन गेले इथे
मोठं मोठे युगपुरुष
इतिहास रंगला पानोपानी तयांचा
साक्ष देतो युगायुगातील शिरीष
पराकाष्ठा त्या रक्ताची
करून राख आयुष्याची
उजळविला इतिहास
त्यागून शृंखला जीवनाची
वेढून गद्दारीची खंजरे छातीशी
चढविले काफीले विद्रोहाची
एकेक शीर छेदूनी पाखंडयांचा
तोडिले बंधने अप्रिय गुलामीची

सरोज फुलझेले,नागपूर
©️सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃💦🍃

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *