शिक्षक दिनानिमित्त ऊपक्रमशील शिक्षिका मनिषा कदम (बोर्डे) यांची अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे गुणगौरव

शिक्षक दिनानिमित्त ऊपक्रमशील शिक्षिका मनिषा कदम (बोर्डे) यांची अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे गुणगौरव

अग्निपंख फाऊंडेशनच्या पुणे विभागीय समन्वयक पदावर नियुक्ती व उपक्रमास प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र प्रदान

यवमाळ :- दिनांक ५ सप्टेंबरला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्याच्या उपक्रमशील शिक्षिका मनिषा महेंद्र कदम (बोर्डे) यांची अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे कोविड१९ च्या कठीन काळातही ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास संपुर्ण राज्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षकांच्या विशेष ऑनलाईन कार्यक्रमात पुणे विभागीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली तसेच सादर केलेल्या नवोपक्रमास प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हाच ध्यास उराशी बाळगलेल्या राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने तसेच इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, त्यांचा सत्कार व गुणगौरव करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होवून दिनांक १६ डिसेंबर २०१७ ला मा. मिलिंद कुबडे, मा. नितीन भालचक्र, मा. दिपक मेश्राम, मा. ओंकार चेके व मा. गजानन गोपेवाड या सर्व संस्थापक सदस्यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने ‘अग्निपंख फाऊंडेशन’ महाराष्ट्र राज्य या समूहाची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील मनाचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले, विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सहशालेय अग्निपंख फाऊंडेशन साठी पूर्णतः समर्पित असल्याने संस्थापक मंडळ व निवड समितीने मनिषा कदम यांच्यावर विश्वास दाखवत यांना अग्निपंख फाऊंडेशनच्या पुणे विभागीय समन्वयक पदी नियुक्ती केली.त्यांचे शैक्षणिक कार्य पुढिल प्रमाणे आहे
नाव..सौ.मनिषा महेंद्र कदम (बोर्डे)
शैक्षणिक पात्रता… बी .ए .डी एड.
शाळा..सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय ,सावेडी अहमदनगर.
उपक्रमात सहभाग,हस्ताक्षर सुधार प्रकल्प, ज्ञानाक्षर छंद वर्गाद्वारे मार्गदर्शन, फलक लेखन
१९ वर्षांपासून शाळेतील फळे आकर्षक रितीने लिहून आलेल्या पालक ,विद्यार्थी तसेच अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून घेतात.
संस्थाचालकांची देखील या उपक्रमात कौतुकाची थाप.
हस्तकला, रांगोळी,रांगोळी कॅलिग्राफी, कोलाजकाम, टाकाऊ पासून नवनिर्मिती यावर मार्गदर्शन व प्रदर्शन, ग्राफिक्स ची आवड शब्दकार्ड PDF ,निर्मिती ,पक्षी निरीक्षण यातून पक्षी रेखाटन. स्टीपलिंग ART, आफ्रिकन ART, जेल पेन ART कला अवगत व वि . ना मार्गदर्शन.
पुरस्कार जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समिती आयोजित पुरस्कार,
साप्ताहिक उपदेश पुरस्कृत जीवन गौरव पुरस्कार
आणि आदर्श शिक्षक पुरस्कार.सामाजिक कार्यात सहभाग.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २७ जुलैला त्यांच्या कार्याचा गुणगौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी घरीच राहून नवोपक्रम घेण्यात आला होता. त्या अभिनव उपक्रमात राज्यभरातून शेकडो शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने उदंड प्रतिसाद लाभला होता. त्या कार्यक्रमात सहभाग घेवून अभिनव पद्धतीने उपक्रमाचे सादरीकरण करणाऱ्या व निवड समितीकडून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या अहमदनगर जिल्हाच्या मनिषा कदम बोर्डे अहमदनगर यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मिलिंद कुबडे (प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ), प्रमुख पाहुणे मा. दिपक चवणे (माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ), मा. नितीन भालचक्र (अधिव्याख्याता गणित विभाग प्रमुख), मा. दिपक मेश्राम (अधिव्याख्याता विज्ञान विभाग प्रमुख), मा. डॉ. राजेश डहाके गो सी गावंडे महाविद्याल ऊमरखेड व निवड समितीचे सदस्य मा. ओमकार चेके, मा. राम राठोड, मा. महेश कुमार यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक गजानन गोपेवाड (राज्य समन्वयक) हे होते तर सूत्रसंचालन व नियोजन जयश्री सिरसाटे (महिला राज्य समन्वयक) यांनी केले. प्रस्तावना सुवर्णा सातपुते (जिल्हा समन्वयक पुणे), तंत्रविभाग ऋतुजा कसबे (जिल्हा समन्वयक मुंबई), आभार अश्विनी वास्कर (जिल्हा समन्वयक यवतमाळ) यांनी मानले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *