आठवणीतला वाडा
लहानाचे मोठे झालो, आम्ही ज्या वाड्यात;
एक रूम असला तरी राहत होतो सुखात,
पटत जरी नसलं, इथे कुणाचे कुणाशी;
नाते जुळले होते मात्र आमचे वाड्याशी,
कुणाची करडी नजर पडली आमच्या वाड्यावर;
सर्वजण जमा झाले, वाडा निस्तनाबुत झाल्यावर,
आठवणी सगळ्या आमच्या गाडल्या गेल्या वाड्यात;
पडलेला वाडा पाहून खळकन अश्रू आले डोळ्यात,
वाडा पडल्यापासून मन लागत नव्हतं कशात;
कारण,दुसरीकडे राहण्यासाठी पैसा नव्हता खिशात,
शेवटी स्तब्ध उभ राहून बघत बसलो वाड्याकडे;
कारण,मन माझं मानत नव्हतं,दुसऱ्या ठिकाणी जाण्याकडे….
🔴 कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे
( तरंग कवितासंग्रह )
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर, नाशिक mob. 8378937746