◼️ काव्यरंग :- दुःखात जगतो आम्हीं

दुःखात जगतो आम्हीं

दुःखात जगतो आम्हीं
स्वप्नं सुखाचे घालून
काढतो दिस ते वनव्याचे
या काळजास जाळून

रोज नवा घाव झेलतो
जगण्या इथं जीवन
सहतो त्या वेदना असंहनीय
मुठीमध्ये आवळून मरणं

गुदमरून येतं काळीज
ओले होते नयन
दुःखात जगतो आम्हीं
स्वप्नं सुखाचे घालून

व्याकुळतो प्राण हा
क्षण तो पहावया सुखाचा
पचवतो न गिळंनारा
खाऊन घास तो दुःखाचा

दुःखात जगतो आम्हीं
स्वप्नं सुखाचे घालून
जगतो आयसे जीवन
जीव निघतो त्यात होरपळून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *