◼️ काव्यरंग :- वधू..✍️सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

वधू

केस काळेभोर अन् मृगनयनी
गोरीपान, सुंदर, नाक चाफेकळी
मध्यम बांधा, लावण्याची खणी
अशी हवी वधू बहुगुणी !

किमान पदवीधर तरी
नोकरी छानशी सरकारी
हुंडा नको, दागिन्यांनी सुशोभित
अशी हवी वधू बहुगुणी !

विणकाम, भरतकाम
अतिरिक्त क्वाॅलिफिकेशन
सुगरण उत्तम असणारी
अशी हवी वधू बहुगुणी !

मनमिळावू, गृहकृत्यदक्ष
हसतमुख, कर्तव्यतत्पर आणि हो,
भाग्यकारक कुंडली असलेली
अशी हवी वधू बहुगुणी !

यंदा आमच्या मुलाचं
लग्न आहे कर्तव्य
पडताळून पहा बरं का
वरीलप्रमाणे हवी वधू बहुगुणी !

🔷◼️✍️◼️ 🔷

प्रिया प्रकाशची”
सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *