लाडबोरी गावात पिण्याच्या दुषीत पाणी पुरवठाने जनतेचे आरोग्य धोक्यात
ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष पणामुळे पिण्याचा पाण्यात आढळले नारु व जंतू
✍️ सुनिल गेडाम प्रतिनिधी
सिंदेवाही : तालुक्यातील लाडबोरी ग्रामपंचायत च्या ढिसाळ कार्यप्रणाली मुळे गावात पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातील जनतेसमोर उभा ठाकला आहे. गावातील नाल्याचा भोंगळ कारभार असो कि ग्रामपंचायत मध्ये केलेला भ्रष्टाचार असो हा प्रकार उजागर केल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.सततच्या पिण्याच्या पाण्यात तुरटी व पावडर चा नियमित वापर केला जात नसल्याने आत्ता तर पिण्याच्या पाण्यात नारू व जंतू निघत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळते आहे. जनतेला वेठीस धरुन त्यांच्या जीवनाशी खेळ खेळला जातो आहे.हा गंभीर प्रकरण समोर असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन काहीही लेणदेणं नसल्याचे सोंग घेऊन कोणत्याही प्रकारची कामे न करता सुस्त बसून तमाशा पाहात आहे.आज जनतेच्या टॅक्स च्या पैशाच्या भरोसा वर पगार उचलून गावालाच आत्ता वाऱ्यावर सैराटपणे सोडून वेठीस धरले जात आहे.ग्रामीण भागातील जनता कोरोना महामारिने त्रस्त असताना ग्रामपंचायत प्रशासन च्या हलगर्जी पणाने कोरोना पेक्षा महाभयंकर जीवघेण्या साथी रोगाचे बळी पडण्याचे चिन्ह दिसत आहे.गावातील सुज्ञ नागरिकांनी नळातून आलेल्या नारू जंतू ची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दिली असता त्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांना माहिती देऊन होणारा प्रसंग टाळता आला असता.परंतु त्या कर्मचाऱ्यांनी ह्याबाबत माहिती दिल्याचे दिसून येत नाही.यावर उपाय योजना केली गेली नसल्याने नागरिकांना अपेक्षित उत्तर मिळाले नसल्याने शेवटी निरुपाय म्हणून रोगराई ला समोरा जावे लागु नये.असा गावावर रोगराई सावटाखाली सामना करावा लागु नये त्यामुळे आपली दूषित पाण्याची पुराव्यानुसार कैफियत पत्रकार समोर मांडुन सुटकेचा श्वास सोडला आहे.◼️