◼️ लघुकथा :- आत्महत्या

आत्महत्या

उन्हाळा संपणारच होता , मोठं मोठे ढग ही निघाय चालू झालंते नागर नी ही उरकलती , जून महिना चालू झाल्ता पावसाळी वारे ही वाहू लागली होती , बघता बघता मृग ही
लागला .रोहिणी नक्षत्र संपताच मृग नक्षत्रात जोरदार असा पाऊस चालू झाला .
पाऊस पडला जिकडे तिकडे पाणी च पाणी झालं मृग नक्षत्रात पेरणी होणार म्हणून सारी शेतकरी ही खुप आनंदीत होते .आयूदा लवकरच पेरणी होणार असं मानून सर्व नी बी भरन केलं कुणी सोयाबीन , कापूस , बाजरी तर कुणी , मुग, तूर , उडीद , मक्का इत्यादी पिंकाच बियाणं
भरलं .सर्वांनी बियाणं भरलं काहीच्या पेरण्या देखील झाल्या तरीही एका शेतकऱ्यांन बी देखील भरलं नव्हतं , तोच तो गावचा सर्वात गरीब आणि भोळसर शेतकरी माधवराव
घरात गरिबी होती , स्वतःच्या चार एकर जमीन मात्र सर्वच कोरडवाहू , जवळ बैला ची जोड , इतरांनच चार पाच एकर पाळी पेर्णीला केलेल रान . सर्वांनी पेरण्या करून घेतल्या आयूदा पावसानं ही साथ दिली .पण नशिबान अजून कुठं ? अशी मनात असंख्य विचार माधवरावांच्या येऊ लागली बियाणा साठी पैसा लागणार पण जवळ तर काहीच नाही
सावकाराकडे तरी कसं जायचं त्याचा पहिलंच देणं अजुन बाकीय , पिक कर्जमाफी झाली पण दुबार कर्जासाठी फाईल मंजूर झाली नाही , अधिकाऱ्यांला ही पैसे दिलेत पण फाईल काय मंजूर होइना , अता कराव तरी काय
काहीच कळणा झाल्त .बायको पोरांचा विचार घेऊन बगू काय मनतीत ते .
सायंकाळी जेवणं आवरली , छोटी छोटी दोन मुलं ती जेवणं झालं की झोपी गेल्ती .हळू आवाजात बायकोला विचारलं , आपलं आयूदा काय कुठं काही अजुन नाही
लोकांनी पेरण्या केल्या , अजुन आपलं बी ही आलं नाही, मला वाटतय ही कर्ज ची फाईल काय लवकर मंजूर होत नाय तंवर आपन आपला सर्ज्या विकूत , जी काय पैसे
येतील त्यातून पेरणी करू शेजाऱ्याच्या एक बैल माघऊत पेरणी झाली की मंग उरलेल्या पैश्यात कर्जाच व्याजही भरूत . बायको चा नकार होता मात्र तिला समजून थोडं सहमत केलं , पेरणी साठी बैल बाजारात आणला होता , व्यापारी येत होती जात होती .कुणी कसे तर कुणी कसे किंमत बैलाची करू लागली , तेवढ्यात त्यातला एक व्यापारी
पुढं आला आणि म्हणला , काय र माध्या केवढ्याला सोडायचा तुला चल सांग , मी घेतो तुझा बैल बोल किंमत येवढं झाल्या नंतर बैल पंचवीस हजाराला सुटला .घरी येताच तालुक्यातून बी बियाणं भरलं , शेजाऱ्यांच्या एक बैल आणून पेरणी देखील केली .

पिंक जोमात उगवल , जस जस मोठं होईन तसं तसं ते डौलदार व तेजदार दिसत होत , कापूस अनं सोयाबीन ची लागवड केलंती .हळू हळू दिवसेन दिवस पिंक मोठं होत होतं .काही दिवस ओलांडतच पिंक काढणी येणार
होती .सावकाराच देणं माघ , सावकार दारी आला .किती दा सांगितलं माधु तुला .अता जास्त वेळ नको मला आजची आज माझे पैसे पाहिजेत .बस झालं दीड वर्ष झालं तुझं
हेच चालूय अता नकोच , माझी मुद्द्ल तरी दे राहु दे व्याज मला ही काही काम असतात ना मला ही संवसार ना आज माझे पैसे मला पाहिजेत .आज पैसे घेतल्यावरच जाणार.
येवढं बोलुन सावकार निघून गेलता .
काय करावं कुठुन आणावा पैसा काहीच कळत नव्हतं बँके ने अजून फाईल मजूर केली नाही .अधिकाऱ्यांला ही पैसे खाऊ घातलेत .तरीही अजून काहीच नाही . काहीच
कळणा झालंत . सोयाबीनच पिंक येयला अजून काही वेळ बाकी होता .
गावात मित्राच्या घरी जाऊन ही पैसा मिळाला नाही सावकार ऐकायला तयार नव्हता .जवळ पैसा ही नव्हता कुनी द्यायला ही तयार नव्हतं .जीवाला फार वैताग आला सावकार दारी येणार .मंग त्याला पैसे कसे द्यायचे आजची
रात्र आहे , उद्या परत सावकार दारी येणार मंग त्यालाअता कोणतं कारण सांगायच , त्याचं ही बरोबरच आहे व्याज त लांबच पण मुद्दल दिली नाही , शेवटी त्यांच्या तो व्यवसाय
अता काही तरी केलंच पाहिजे असं मनात माधवरावांच्या मनात सतत येत होतं .
दिवस उजाडला होता सावकार त्याचं आवरून माधवच्या घरी आलता .घरी जाऊन हाक मारली माधवराव तेवढ्यात आतून पत्नी चा आवाज आला .ते बाहेर गेलेत येतील च
बसा तुम्ही चहा करते असे म्हणून पत्नी घरात गेली चहा बनवला च होता .माधव कसा येईना . पोराला पारा कड जा बग तिथं असतील बोलव त्यांना .असं मनत तिनं पोराला
मंदिराकड जायला सांगितलं .हे घ्या चहा सावकार.ते पहाटे पहाटे च गेलेत बाहेर पण अजून कसे आले नाहीत. पोराला सांगितलंय येतील. सावकारा ना समजून सांगत असताना च, गावात हंबर्डा उठला होता काय झालं काय झालं सारी लोकं माधवराव यांच्या घरा कडे येत होती. पत्नी पहात होती , लोकांनाती
विचारु लागली , अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते हे सर्व काय प्रकार य लोकांनी मौन धरलं होतं .कुणाची ही हिम्मत होत नव्हती सत्य सांगायला. तेवढ्यातच रडत ओरडत
पोरगं घराकड धावत आलं. आई आई त्यांची ही बोबडी वळली होती , गावातल्या एका न सांगण्याच धाडस केलं माधवरांवनी नदीकाठी फाशी घेतली आहे .हे बोल कानी पडताच पत्नी न अगं टाकलं , गावातल्या बायानी तिला
सावरल . घटना स्थळी पोलिस ही आली , पंचनामा झाला सावकार अडचणीत येणारंच तेवढ्यात गावच्या लोकांनी सावकारा कुन बाजू मांडली .सत्तर हजारांसाठी माधवरावनी आत्महत्या केली पोलिस पंचनामा झालता नेते येत होती जात होती .मात्र माधवची पत्नी अनं पोरंग अथांग दुःखात होती .साऱ्या तालुक्यात माधवरावांच्या आत्महत्त्याच्या वार्ता
पाण्यात तेलाच्या तवंगा सारखी पसरली होती. तालुक्याचे पत्रकार घटनास्थळी आलते . पत्रकारांनी मुद्दा उचलून धरला. आमदार , खाजदार .भेट देऊ लागली होती .सभा_
गृहात विरोधीपक्षांनी मुद्दा उचलून धरला महाराष्ट्र सरकारन पाच लाख रुपए मदत म्हणून मंजूर केले .
काही दिवस निघून गेली एक अधिकारी माधवच्या घरीजाऊन त्यांच्या पत्नीस व मुलास जवळ बोलवले बॅगेतहात
घालत एक कागद काढला अनं म्हणाला , हे घ्या चेक सरकारने तुम्हांला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपए निधी दिलाय. माधवची पत्नी दुःखात होती मुलांनी तो चेक
घेण्यास हात समोर करताच, तिनं त्याला ओढले अनं मौन सोडलं , बापाची किंमत घेतोस काय पोरा ,अरमातीत गेला
तुझा बाप ह्या पैश्यांमुळ, नको घेऊस ते .तिचा राग थांबत नव्हता , अधिकाऱ्यांला ती बोलत होती .अता मेल्यावर या सरकारने आम्हांला पाच लाख रुपए दिले.म्हणजी आम्हां
शेतकऱ्यांला काय उपकार केले .सत्तर हजारांसाठी मेलाय माझा पती , कर्ज माफी मागितली नव्हती आम्हीं पिंककर्ज
मागितलं होतं .तेही बँकेन मंजूर केलं नाही, तेव्हाचआमची मदत केली असती तर आज आमचा संवसारउध्वस्त झाला
नसता . किमान कर्ज तरी मंजूर करायचना , मेल्यावर पाच लाख द्यायला तयार आहात मंग, जिवंत असतानी फ़क्त सत्तर द्यायचे ना .जा इथून नकोय तुमची आम्हांला मदत
निघा येथून .

खरच हे बोलणं तिचं सत्य होतं , तिच्या बोलण्यात तथ्य होतं सत्तर हजार रुपयांसाठी आत्महत्त्या केली अनं पाच
लाख मेल्यानंतर सरकारनी दिले वेळी प्रासंगी किमान ७० हजार रुपए सरकारने दिले तर या पाच लाखात किती असे माझ्या शेतकऱ्यांचे प्राण वाचतील , बँकेने वेळी च मदत
केल्यावर ही वेळ पण येणारं नाही…

🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *