◼️ प्रासंगिक लेख :- कोरोना तु आमचं जिवंन विस्कळीत केलंस

कोरोना तु आमचं जिवंन विस्कळीत केलंस

               सर्व काही सुरळीत चालू होतं तु आलास , अन हाहाकार केलास. आमच्या आनंदी जीवनात , सगळी कड दुःखच दुःख करुन टाकलंस , जिकडे पहावे तिकडे तुच दिसतोस .
मोठे मोठे शहरच काय तर गावात देखील तु सोडलं नाहीस त्यात ही प्रवेश केलास .वाटलं होतं तुझं हे वारं लवकरच संपून जाईल , सारं जग मोकळा श्वास घेईल पण तु अजुन आमची दुर्दशा करण्यासाठी तटस्थ उभा आहेस , अजुन किती हाल करायचेतरे तुला आम्हां गोरगरिबांचे जनसामन्याचे.
बस झालं अता नकोय खूप क्रूर वागलास गेली अनेक महिन्यापासुन अनेक जन तुझ्या मुळे बेरोजगार झाले आहेत. अरे आम्हांला मोकळं जगु तरी देणा , कधी न उपाशी राहणाऱ्या ला आज तुझ्यामुळे खायचे वांदे झालेत , अर्थ व्यवस्था सारी डगमगुण टाकलीस , जगणं सारं उध्वस्त करुन टाकलस र .ना काम आहे ना शिक्षणं ना नौकरी ना रोजगार अश्यात नेमकं काय करावं हे कळायला मार्ग नाही , आम्हां जनसामान्या साठी जीवाच रान करुन डॉक्टर , पोलिस , प्रशासन , सरकार राब राब राबत आहे त्यांची तरी थोडी दया तुला येऊदेरे , तुझ्यासह या युध्दात आम्हीं अनेक आमचे योध्दे गमावून बसलोत , त्यांच्या परिवाराच विचार केलास कारे , काय वेळ आणलीस त्यांच्यावर येवढं ही क्रूर वागणं बरं नाहीे , जनसामान्याचा आधार जेंव्हा जातो त्यांच दुःख तुला काय कळणार , तुला फक्त वेदना आणी घाव द्यायचच येतं , गरीब कुटुंबातला कर्ता धरता जेंव्हा या लढाई घरला सोडून जातो तेंव्हा त्याचे लेकरबाळ कसं जगत असतील हे तरी बघ ना , अरं काय खेळ लावलास रे तु हा अनेकांचा सुखी संवसार उध्वस्त केलास , कुण्याच्या बाबा ला नेलंस तर कुनाची लेकरे आई वाचुन अनवाणी झालीत अरं ह्याची तरी तुला जान येवुदे ना तुला. जेंव्हा तुझ्या मुळे एकाच कुटुंबातील अनेक जन जातात तेंव्हा त्यांना होणाऱ्या दुःखाचा विचार केलास का? काय अवस्था झाली असेल त्यांची , कामूण हा वनवा पेटवलास रे काय केलंत तुझं आम्हीं मानवानी त्याच्या येवढा सूड घेतोस .सुरवातीला वाटलं होतं तुला आलास तसा जाशील लवकरच तुझ्या या जाळ्यातून मानव बाहेर पडतील , पण तसं तुला मान्य नव्हतं .तुझी भीती आज आमच्या मनात कसलीही राहिलेली नाही , पण तु मात्र तुझं विक्राळ रूप मात्र सोडलं नाहीस नवीन नवीन मित्र परिवारा त तुझा कोप केल्याचे कानी यायच पण आज तुझी भीती आमच्या मनात नाही पण तु आम्हां मानवाचा जीव घेणे ही कमी केलं नाहीस. रोज काहीतरी जास्त ऐकायला पहायला मिळतय नको रे अता बस झालं अजुन तुझा कोप नको करु आत्ताच आमचं जीवन विस्कळीत करुन टाकलंस अजुन नको करु तुझ्यामुळे अनेक जन अनाथ झाले पोरके झाले अनवाणी केलंस त्यांना. रोज कुणा कुणावर ही वेळ तु आणत आहेस , बस झालं र थांब र अता नको तूझे हे घाव असहनिय झालेत आता सारे ….

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *