◼️ काव्यरंग :- बाबा ही ती वेळ नव्हती..

◼️ बाबा ही ती वेळ नव्हती..

अथांग जनसागरात आम्हाला एकटे सोडून जाण्याची;
सवय नाही आम्हाला पावला-पावलावर खस्ता खाण्याची,

मला अजून तुमच्यासोबत खूप काही बोलायचं होतं…
तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही बाकी होतं…

इतक्या कमी वयात आमचा निरोप घेतला तुम्ही;
जीवनातील सुखदुःखाच्या कथा कुणाला सांगू आम्ही,

हसत-खेळत तुम्ही आम्हाला नकळत सोडून गेले;
अविस्मरणीय आठवणींची खाण मात्र आमच्या हृदयात ठेवून गेले,

बापाची महती लेखणीतून शब्दात मांडता येणार नाही;
बापाची उणीव आयुष्यात कधीच भरून निघणार नाही

म्हणून म्हणतो,”बाबा,ही ती वेळ नव्हती…
निरोप आमचा घेण्याची,अनंतात विलीन होण्याची.”

◼️✍ कवी-श्री.दीपक सहाणे, नाशिक
संपर्क-8378937746

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *