◼️ काव्यरंग :- हवालदिल

हवालदिल 

माय तुह्या मरण्यान
म्या हवालदिल झालो
कवनाले हाक मारू आई
जगात राह्यली नाय आता
भिमाई माहयी मनोरमाई !!

जलमाले आला जीव
नासका कुजका देह
येउ दे रे देवा कीव
तरासाची इडापिडा जावो
माय आत्माले शांती देवो ! !

शरणम् गच्छामी बुध्दगया
अजीब तुही छाया लिलया
सदगती फेरा न चुके साऱ्या
लक्ष यवनी चवऱ्यांसी फेऱ्या
भोगुनी म्या अपुर्ण पुर्ण केल्या !!

वय आयु सरले सरले
सरणावर म्या खोड रचले
हवालदिल वउन लावा खदखदे
सारे कसे आसु वंगाळ झाले
माय तुया जाण्यान पोरके झाले !!

◼️✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *