◼️ काव्यरंग :- पैठणी

🔷◼️ पैठणी ◼️🔷

पैठणी सर्वांची आवडती असते
सदा सर्वदा असते तीची शान
लग्नकार्य असो की नववधूचा साज
मराठ्यांची आहे ती नावलौकिक महान

साड्यांमध्ये भारीच असते पैठणी
साडीवर असते नक्षी काठी मोर
गडद रंगाची वेगवेगळ्या प्रकारची
समारंभात असते ती चंद्रकोर

रंगीबिरंगी पैठणी बघून भारावून येते
बुटी दार कशिदा शोभून दिसते फार
पैठणी असते सर्वात छान साडी
पाहून ललनाचे रूप होते राव गार

पैठणी साडी असावी एक तरी स्त्री जवळ
पैठण आहे तिचे माहेरघर
मनाला भुरळ घालते साडीची रंग संगती
किती साड्या असल्यातरी नाहीयेत पैठणीची सर

🔷◼️✍️◼️🔷

सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
8007664039.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *