आमदार किशोर जोरगेवार यांची कोरोनावर मात

आमदार किशोर जोरगेवार यांची कोरोनावर मात

उद्या कोव्हिड सेंटरची पाहणी करून घेणार परिस्थितिचा आढावा

चंद्रपूर : कोरोनाची लागण झाल्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून उद्या पासून पुन्हा ते नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते चंद्रपूर येथील कोव्हिड सेंटरची पाहणी करणार असून तेथील उपाययोजनांची माहिती घेणार आहे. तर 11 वाजता पासून नागरिकांना भेटण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असणार आहे. मात्र अत्यावश्यक कामा करिताच नागरिकांनी यावे, नागरिकांनी गर्दी न करता सामूहिक अंतर पाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चंद्रपुरात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्या बाहेर जाण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोनाबाधित निघाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होता. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *