-ii सहपरीवार ii-
सहकुटुंब सहपरीवार
वात्सल्य एकजुट फांदी
घरादारा घरपण शोभा
वृक्ष वंश बहरे आनंदी !!
वसुदैव आईबाबा दागिना
जन्म सार्थक शुध्द कुस वान
कर्णी पैरावे नेत्री दिखावे
ऋतु पोषक पाऊस उन्ही दान !!
घरोघरी मातीच्या चुली
संयुक्तिक विभक्त जाहली
अविश्वी तिमिरी कोठडी
भिन्न मते रुंदावते खोली !!
नात्याच्या माणसात का भेद
कशासाठी स्वार्थी वाद
सहपरीवारातुन नको करू अनाथ
आईबापाची वाटणी इस्टेटी तुकडे
वृद्ध मनोमिलनी न तोडू साथ
सहपरीवाराचा न सोडा रे पथ !!
◼️✍️ प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह